धावत्या रेल्वेतून उतरताना तरूण फलाटाखाली

Updated: Aug 6, 2018, 03:53 PM IST

ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशनवर काल सकाळी एका तरुणाचा जीव थोडक्यात बचावला. धावत्या रेल्वेतून  उतरण्याच्या प्रयत्नात तरुणाचा पाय घसरला. आणि तो थेट फलाटखाली गेला.  गोरखपूर-कुर्ल्यांला येणारी सुपरफास्ट एक्सप्रेस ठाण्याहून सकाळी ८ वाजून ०६ मिनिटांनी पुढे निघत होती. तेवढ्यात एक तरुणाने चालत्या रेल्वेतून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो फलाट आणि गाडीच्या जागेत अडकला.

जवानानं जीव वाचवला 

आरपीएफचे कॉन्स्टेबल अरुण कुमार यांची नजर या तरुणावर पडली. त्यांनी लगेच त्याच्या दिशेनं धाव घेतली. फलाटावरच्या इतरांच्या मदतीनं त्याला तात्काळ बाहेर काढलं...त्याचे प्राण वाचवले. तरुण उत्तरप्रदेशातल्या देवापर गावचा असून त्याचं नाव ब्रिेश कुमार मसहा असं आहे.