Tata IPO : टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात एंट्री, गुंतवणुकीची मोठी संधी

Tata IPO : 2004 नंतर प्रथमच टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात  नोंदणी करणार आहे. तब्बल 18 वर्षानंतर बाजारात एंट्री केली आहे. 

Updated: Dec 2, 2022, 03:25 PM IST
Tata IPO : टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात एंट्री, गुंतवणुकीची मोठी संधी  title=

Tata Group IPO : 2004 नंतर प्रथमच टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात  नोंदणी करणार आहे. (Maharashtra latest news )तब्बल 18 वर्षानंतर बाजारात एंट्री केली आहे. 'टाटा प्ले' या 'डायरेक्ट टू होम' या सेवेचा आयपीओ टाटा समूह (Tata Group IPO) आणणार आहे. 30 नोव्हेंबरला बीएसई आणि एसएसईमध्ये टाटा प्लेचा आयपीओ येत आहे. त्यासाठीची आवश्यक कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. (Tata Group stock market entry)

जवळपास 18 वर्षानंतर टाटा समूहातील...

2004 साली टीसीएसचे शेअर बाजारात आणल्यानंतर टाटा समूहातील एकाही कंपनीनं शेअर बाजारातून पैसे उभे केलेले नाहीत. म्हणजेच जवळपास 18 वर्षानंतर टाटा समूहातील एका महत्वाच्या कंपनीत गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. टाटा प्लेचा आयपीओ नेमका कधी बाजारात येणार याविषयी तूर्त कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. टाटा समुहाने सादर केलेल्या माहितीनुसार टाटा प्लेला गेल्या आर्थिक वर्षात 69 कोटी रूपये नफा झालाय. तर कंपनीची एकूण उलाढाल चार हजार कोटींच्या आसपास आहे. 

टाटा टेक ही टाटा मोटर्सची सब्सिडिअरी कंपनी आहे. टाटा समुहातील या कंपनीचा IPO आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत आणण्याबाबत नियोजन आहे. येत्या तिमाहीत कंपनी सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्र सादर करेल. सध्या कंपनीची इश्यूसाठी मर्चंट बॅकर्सशी बोलणी सुरु आहेत. टाटा टेकचा भर हा प्रामुख्याने आँटोमोटिव्ह, एअरोस्पेस, औद्योगिक उत्पादने आणि उद्योग क्षेत्रावर आहे. याचे मुख्य केंद्र पुण्यात आहे. याशिवाय जगभरात 18 ठिकाणी वितरक केंद्रे असून 93 हजार कर्मचारी काम करतात.

टाटाच्या गाड्या महागल्यात

दरम्यान, टाटा मोटर्सच्या काही गाड्या झाल्या आहेत. (Tata motors car Price hike) गेल्या महिन्यापासून दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे टाटा मोटर्सच्या गाड्या खरेदी करणे आता अधिक महाग होणार आहे. कंपनीने प्रवासी वाहनांच्या किंमतीत 0.90 टक्के वाढ केली आहे.  टाटाच्या पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये सफारी, हॅरियर, अल्ट्रोझ, नेक्सॉन, टियागो आणि टिगोर या कार आहेत. टाटा मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची या वर्षातील ही चौथी वेळ आहे.