हवं तर आम्ही केंद्राचे पाय पडायला तयार; परंतु ऑक्सिजनचा पुरवठा करा

राज्य सरकार रुग्णांना वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करीत आहे. राज्यात ऑक्सिजनचा गरजेनुसार पुरवठा होत नाहीये

Updated: Apr 23, 2021, 01:00 PM IST
हवं तर आम्ही केंद्राचे पाय पडायला तयार; परंतु ऑक्सिजनचा पुरवठा करा title=

मुंबई :  कोरोना संकटामुळे राज्यात आरोग्य आणिबाणीसारखी स्थिती झाली आहे.  अशात राज्य सरकार रुग्णांना वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करीत आहे. राज्यात ऑक्सिजनचा गरजेनुसार पुरवठा होत नाहीये. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 'केंद्र सरकारचे पाय पडायला तयार आहे. परंतु आम्हाला ऑक्सिजन द्या' असे म्हटले आहे.

राज्य सरकार रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न करीत आहे. परंतु राज्यातील कोरोना रुग्णांची कठीण परिस्थिती पाहता ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर तातडीने गरज आहे. आम्ही केंद्राला नम्रपूर्वक विनंती करतो की, आम्हाला ऑक्सिजन द्या, त्यासाठी आम्ही केंद्राचे पाय पडायलाही तयार आहोत'. असे राजेश टोपे य़ांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

ऑक्सिजन देण्याचा अधिकार केंद्राकडे

देशातील सर्व राज्यांना ऑक्सिजन पुरवण्याचा अधाकर केंद्र सरकारकडे आहे. महाराष्ट्र् कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे ऑक्सिजन आपल्या ठरलेल्या ठिकाणी तातडीने पोहचावा यासाटी ग्रीन कॉरिडोर तयार करावा अशी विनंती टोपे यांनी केंद्राला केली आहे.