पुणे : राज्यातील शाळांना (Maharashtra Schools) उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे. 2 मे ते 12 जून दरम्यान उन्हाळी सुट्टी असणार आहे. तर 13 जून ला शाळा पुन्हा सुरु होणार आहेत. विदर्भातील शाळांना 27 जून पर्यंत सुट्टी असणार आहे. शाळांना परीक्षांचे निकाल सुटीच्या काळात निकाल घोषित करता येणार आहे. निकाल विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित शाळांची असणार आहे. राज्य शासनाकडून यासंदर्भात परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. (Summer vacation for maharashtra schools announce)
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेला 2 मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरु होणार आहे. विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता येथील शाळा 27 जूनपासून सुरु होणार आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीचा विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात. पण कोरोनामुळे 2 वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात आता शाळा सुरु झाल्या आहेत. ऑनलाईन वर्गानंतर आता प्रत्य़क्षात वर्ग भरु लागले आहेत. कोरोनामुळे झालेलं नुकसान भरुन काढण्याचं आव्हान शिक्षक आणि शाळेपुढे असणार आहे.
याआधी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पण या बातमीनंतर विद्यार्थ्यांसह पालक ही नाराज होते. त्यानंतर आता 2 मेपासून आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.