संभाजी भिडेंच्या अटकेसाठी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

गणेश पवार हा रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता आहे. 

Updated: May 2, 2018, 04:53 PM IST
संभाजी भिडेंच्या अटकेसाठी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न title=

मुंबई : मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीय. मंत्रालयासमोर गणेश पवार नावाच्या कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पवारने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येतेय. गणेश पवार हा रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता आहे. यावेळी गणेश पवारला पोलिसांनी वेळीट ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. 

दरम्यान, संभाजी भिडे यांना अटक केली तर वातावरण निवळेल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र एकबोटेंना अटक करण्यात आली असून भिडेंवर मात्र कोणतीही कारवाई न झाल्यामुळे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. 

उल्लेखनीय म्हणजे, भिडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चांगलीच जवळीक आहेत. एवढंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी देखील त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. सर्वच पक्षातील नेते भिडे गुरुजींना गुरुस्थानी मानतात. १ मे २०१६ रोजी सांगलीत शिवसेना आणि शिवप्रतिष्ठान यांचा संयुक्त मेळावा झाला होता. त्यावेळी भिडे गुरूजींनी शिवसेनेचं कौतुक करताना, भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली होती.