भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण

ट्विट करून दिली माहिती 

Updated: Sep 19, 2020, 08:56 PM IST
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण  title=

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुनगंटीवार यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. 'माझी कोव्हिड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉल चे पालन करून स्वतःची चाचणी करून घ्यावी ही विनंती,' अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 

 

सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी ही विनंती देखील त्यांनी केली आहे. 

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या पत्नी नयना कडू यांना देखील कोरोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकूण बारा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  

आतापर्यंत अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सगळ्या नेत्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.