मुंबई : राज्यात आरोग्य भरती गट 'क' आणि गट 'ड'चा पेपर फुटल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. मुंबई आरोग्य विभागाचे संचालक डॉ. महेश बोटले आणि परीक्षा घेणारी न्यासा कंपनीनेच पेपर फोडून दलालांना पुरवल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. असे असताना ही भरती प्रक्रीया रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे.
आज ट्विटरवर mpsc समन्वय समिती महाराष्ट्र राज्यने सोशल मीडियावर विद्यार्थ्यांना राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी मोहिम चालवली. त्यामुळे ट्विटरवर #आरोग्यभरती_रद्द_करा हा हॅशटॅग ट्रेंड होत होता.
आरोग्य भरतीचे गट-क आणि गट-ड दोन्ही पेपर फुटल्याचे पोलिसांनी जाहीर केलंय तरीही @rajeshtope11 टोपेजी परीक्षा रद्द करायला तयार नाहीत
ही आरोग्य भरती पूर्णपणे तत्काळ रद्द करण्यासाठी उद्या सकाळी ११ ते १२ वेळेत #आरोग्यभरती_रद्द_करा या ट्विटर वॉर मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे pic.twitter.com/xT1yUGX1Oa
— Mpsc समन्वय समिती महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) January 15, 2022
विद्यार्थी या हॅशटॅगखाली आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना दिसले. अनेक विद्यार्थी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना टॅग करून जाब विचारीत होते. ही भरती रद्द करावी अशी मागणी सर्व विद्यार्थ्यांनी लावून धरली होती.
ज्या कंपनीकडे परीक्षेचे काम दिले तीने पेपर फोडला, आरोग्य विभागाच्या सर्वात जबाबदार अधिकाऱ्याने पेपर फोडला. मग भरती रद्द करण्यास कसली वाट पाहत आहात असा सवाल विद्यार्थी आरोग्य मंत्री टोपे यांना विचारीत होते.