आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये SITI Networks च्या एकूण महसुलात १३ टक्के वाढ

 सिटी नेटवर्क लिमिटेड  (SITI Networks Limited) जी एस्सल (Essel Group) ग्रुपची एक कंपनी आहे. 

Updated: May 31, 2019, 12:30 PM IST
आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये SITI Networks च्या एकूण महसुलात १३ टक्के वाढ title=

मुंबई : सिटी नेटवर्क लिमिटेड  (SITI Networks Limited) जी एस्सल (Essel Group) ग्रुपची एक कंपनी आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये चौथ्या तिमाहीत आणि संपूर्ण आर्थिक वर्षात आपला आर्थिक अहवाल सादर केला आहे. आपणास माहित असेल SITI केबल नेटवर्कचं जाळं देशातील ५८० शहरांमध्ये विस्तारलं आहे. हे भारतातील सर्वात मोठं मल्टी सिस्टम ऑपरेटरने (MSO) चालतं. सीटी नेटवर्क लिमिटेडचं ऑप्टीकल फायबर ३३००० किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं आहे.

अहवालातील महत्वाच्या बाबी

१) सिटी नेटवर्क केबलने आर्थिक वर्षात २०१८-१९ मध्ये चांगली आघाडी घेतली आहे. ऑपरेटिंग EBITDA मध्ये २ टक्के जास्त वाढ झाली आहे. ही वाढ 3001 मिलियन आहे. म्हणजे जवळजवळ ३०० कोटी.
२) ऑपरेटिंग EBITDA मार्जिन १.८ पट वाढ झाली, म्हणजेच २१.२० टक्के.
३) सब्सक्रिप्शन रेवेन्यू १९ टक्के वाढून 9537 मिलियन (953.70 कोटीपर्यंत) आहे.
४) SITI नेटवर्कच्या सर्व कस्टमर नवं टेरिफ ऑर्डर स्वीकारलं आहे.

 

एकूण महसुलात १३ टक्के वाढ

 

अहवालानुसार, ऑपरेटिंग EBITDA 3001 मिलियन आहे. ऑपरेटिंग EBITDA मार्जिन १.८ पट वाढ झाली, म्हणजेच २१.२० टक्के वाढ झाली. सब्सक्रिप्शन रेवेन्यू १९ टक्के वाढून 9537 मिलियन (953.70 कोटीपर्यंत) वाढलं आहे. SITI नेटवर्कच्या सर्व कस्टमर नवं टेरिफ ऑर्डरवर मायग्रेट झाले आहेत.