मुंबई : लग्न म्हटलं की नाचं गाणं आलं... पण
जेव्हा लग्नात वहिनी आपल्या जावेचं स्वागत नाचत गाजत करते तेव्हा.... असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक वहिनी आपल्या दिराच्या लग्नात "लो चली मैं... अपने देवर की बारात" या गाण्यावर नाचत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटीझन्सच्या पसंतीला पडत आहे.
आता आपण पाहिलं आहे की, लग्नात अनेक जण सरप्राईज डान्स ठेवतात. नववधु आणि वराला एक गोड सरप्राईज देण्याचा हा प्लान असतो. असाच हा सरप्राईज डान्स व्हिडिओ सध्या पसंतीला पडत आहे. लग्नाचा सिझन म्हटला की, असे प्रकार घडतच असतात. पण जेव्हा हे व्हायरल होतात तेव्हा अधिक आनंद होता.
जावा - जावाचं नातं हे कायम सासू - सुनेच्या नात्याप्रमाणे थोडं कठोर सजमलं जातं. पण जेव्हा एका नववधुचं नव्या घरात सासरी असं स्वागत होतं तेव्हा ती खरंच मनपासून निवांत होत असेल. हा व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर होत आहे.