आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : सिंधुदुर्गाजवळील मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj Stutue) कोसळल्यानंतर शिवप्रेमी संतप्त आहेत.आता या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. शिल्पकार जयदीप आपटे (Jaideep Apte) आणि स्ट्रक्चरल कन्सलटन्ट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, गुन्हा दाखल होताच आपटे आणि पाटील दोघेही फरार झालेत. शिवरायाच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर चेतन पाटील यांच्याप्रमाणेच जयदीप आपटे घराला टाळे लावून फरार झालाय.
संभाजी ब्रिगेड आक्रमक
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर अनेक ठिकाणी निदेर्शने करण्यात आली. आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जयदीप आपटे यांच्या कल्याणमधल्या घरावरती अंडी फेकून आणि पोस्टर लावून आंदोलन केलं. त्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. इमारतीच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
अमोल मिटकरी यांचा गंभीर आरोप
दरम्यान मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (RajKot Fort) शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार्या कंत्राटदार जयदीप आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहेय. महाराजांच्या डाव्या डोळ्यावर खोप आपटे यांनी जाणीवपूर्वक दाखवल्या आरोप यावेळी मिटकरींनी केला आहेय..
समिती स्थापन
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं त्याबाबत आता राज्य सरकारनं तांत्रिक समिती स्थापन केलीय. तसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.. शिवाजी महाराजांचा पुतळा का कोसळला या मागील कारणांचा शोध तांत्रिक समिती घेणार आहे.. नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती पुतळा पडण्यामागील कारणाचा शोध घेणार आहे.. या समितीत स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटीत काम करणारे तज्ञ असणार आहे.. ही समिती पुतळा कोसळण्यासाठी कोण जबाबदार आहे त्याची जबाबदारी निश्चित करणार आहे.. तसेच नवा भव्य पुतळा उभारण्यासाठी नव्या समितीचीही नियुक्ती केली जाणार आहे... वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत.
राडाप्रकरणी गुन्हे दाखल
राजकोट किल्ल्यावर काल घातलेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. राडा करणाऱ्या ठाकरे (Thackeray Group) आणि राणे या दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांपैंकी एकूण 42 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. विशेष म्हणजे 42 जणांसह शेकडो अज्ञातांवरही गुन्हे दाखल झालेत.