Shraddha Murder Mystery: मुंबईल्या श्रद्धा वॉकर (Shraddha Walker) या तरुणीच्या निर्घृण हत्येने देश हादरला आहे. तिच्याच प्रियकराने श्रद्धाची गळा दाबून हत्या करत तिच्या शरिराचे 35 तुकडे केले आणि त्यानंतर दिल्लीतल्या विविध ठिकाणी ते तुकडे टाकून दिले. तब्बल पाच महिन्यांनी या हत्येचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन (Aftab Poonawala) याला अटक केली आहे.
आईने केला होता विरोध
श्रद्धा आणि अफताब मुंबईत एका कॉलसेंटरमध्ये काम करत होते, तिथेच त्यांची ओळख झाली आणि त्यांच्या प्रेम झालं. यानंतर दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live-in relationship) राहू लागले. ही गोष्ट जेव्हा तिच्या आईला कळली तेव्हा तीने श्रद्धाला समजवण्याचा प्रयत्न केला. पण श्रद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. काही काळ दोघं चांगले राहिले, पण कालांतराने दोघांत लहान-सहान गोष्टींवरुन वाद होऊ लागले. आफताब तिला मारहाणही करत होता. आईला तिने याबद्दल अनेकवेळा सांगितलं होतं.
वडिलांकडूनही समजूत घालण्याचा प्रयत्न
2020 मध्ये श्रद्धाच्या आईचं आजारपणामुळे निधन झालं. यानंतर वडिलांनीही श्रद्धाची अनेकवेळा समजूत घालण्याचा प्रयत्न केला. घरी परतण्याचा सल्लाही तिला दिला. पण तीने वडिलांचंही ऐकलं नाही. मारहाणीनंतरही श्रद्धा आफताबबरोबर रहात होती. श्रद्धाच्या काही मैत्रिणींकडून वडिलांना तिच्याबद्दल माहिती मिळत होती.
एकेदिवशी श्रद्धाच्या एका मित्राने 2 महिन्यांपासून तिचा फोन बंद येत असल्याचं श्रद्धाच्या भावाला सांगितलं. ही गोष्ट त्यान वडिलांना सांगितली. वडिलांनी तात्काळ श्रद्धाला फोन केला पण तिचा पोन स्विच ऑफ येत होता. त्यामुळे वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी मुंबईत पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली.
असा झाला पर्दाफाश
मुंबई पोलिसांनी दिल्ली पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी दिल्लीतल्या मेहरोली पोलीस स्थानकात श्रद्धाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ प्रकरणाचा तपास सुरु केला आणि आफताब पूनावाला याला ताब्यात घेतला. पोलीसी हिसका दाखवताच आफताबने आपण श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली.
श्रद्धाची निर्घृण हत्या
आफताब हा महाराष्ट्रातील पालघर इथं राहतो. श्रद्धाबरोबरच्या प्रेमप्रकरणाला आफताबच्या घरच्यांचा विरोध होता. श्रद्धाने आफताबवर लग्नासाठी दबाव टाकला. त्यानंतर आफताबने श्रद्धाला लग्नाच्या बहाण्याने मुंबईहून दिल्लीत आणले आणि तिची हत्या केली. आफताबनं श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. त्यानंतर दिल्लीत मेहरोलच्या जगंलात वेगवेगळ्या ठिकाणी ते तुकडे फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावली. यासाठी त्याने घरात नवीन फ्रिज आणून ते तुकडे फ्रिजमध्ये अनेक दिवस ठेवले होते.
दडलं गेलं असतं श्रद्धाच्या हत्येचं रहस्य
श्रद्धाचा फोन बंद आढळल्यानंतर तिच्या वडिलांना काही तरी अघटीत घडल्याचा संशय आला नसता तर कदाचित श्रदाच्या मृत्यूचं रहस्य मेहरोलीच्या जंगलात कायमचच दडलं असतं.