सचिन गाड / मुंबई : निवडणुका आल्या की मोठ्या प्रमाणात पैसा हा चलनात येतो. त्यात लोकसभा निवडणुका म्हटल्या की ओतल्या जाणारा पैसा हा लाख कोटींच्या घरात असतो. (देशभरात अनेक ठिकाणी कारवाईत कित्येक कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे.) निवडणूकी दरम्यान जशी दारूची विक्री वाढते तसाच त्याचा परिणाम हा अमलीपदार्थांच्या विक्रीवरदेखील पडतो. यावेळी निवडणुकीतच अमलीपदार्थांची विक्री ५०-६० टक्क्यांनी वाढली आहे.
निवडणुकीची घेषणा होताच आचारसंहिता लागते. प्रत्येक उमेदवाराने प्रचारात किती पैसे खर्च करायचे, कितीच्या जाहिराती द्यायच्या पक्षाने किती खर्च करायचे. या सगळ्याचे नियम असतात पण नियमांना कसं धाब्यावर बसवायच हे काही आपल्या नेत्यांना सांगायला नको. या नियमांना डावलून सगळेच पक्ष आणि पक्षाचे लागेबंधे असणारे व्यापारी लाखो करोडो रूपये निवडणूकीत अक्षरशहा ओततात. प्राचारात तुफान पैसा ओतला जातो, प्रचारात आणि सभांना गर्दी कशी जमवली जाते हे काही वेगळं सांगायला नको. प्रचाराला आलेल्या प्रत्येकाचा रेट ठरलेला असतो. त्या बरोबर पैसा हा अगदी तळागाळापर्यंच पोहोचवला जातो. अश्या प्रकारे आलेल्या पैश्याचा थेट परिणाम हा दारू आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर होतो.
निवडणुकीदरम्यान अमली पदार्थांची विक्री वाढणे काही नवीन नाही आत्तापर्यंत निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली कारावाई डोळे दीपवणारी आहे. यावर्षी आत्ता पर्यंतच ६ कोटी रूपयांचे अमलीपदार्थ आणि २१ कोटी रूपयांची दारू पकडण्यात आली आहे. जशी निवडणूकी टप्पे पूढे सरकतील आणि निवडणूकीची तारीख जवळ येईल तसं अमली पदार्थांच सेवन त्यांची विक्री वाढणार आहे. यावर जरब बसावा म्हणून मुंबई पोलिसांनी देखील कंबर कसली असून आता ड्रग पेडलरवर थेट मकोका लावण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
निवडणकीदरम्यान तरी अमली पदार्थांच्या विक्री वाढू नये त्याने निवडणूका प्रभावीत होऊ नये, म्हणून निवडणूक आयोगासह पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत खऱ्या पण त्याला किती यश येते, यावरु प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.