मुंबई : सतत धकाधकीचं आयुष्य जगणाऱ्या मायानगरी मुंबईच्या प्रत्येक नागरिकाची एक व्यथा आहे. इथं प्रत्येक क्षणाला प्रत्येक बोळात अशा काही घटना घडत आहेत, ज्यामुळं नियती किती क्रूर होऊ शकते याचा अंदाज येत आहे. सध्या एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. जिथं, 30 वर्षीय मॉडेलनं शुक्रवारी आयुष्य संपवत अपयशालाही पूर्णविराम दिला आहे. मुंबईतील अंधेरी भागात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये ती मृतावस्थेत आढळली. (Shocking news 30 Year Old Model ends life Hangs Herself in Hotel Room In Mumbai left Suicide Note)
आपल्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं म्हणत तिनं शेवटचं पत्र लिहिलं आणि त्या पत्रानंतरच तिनं स्वत:च्या आयुष्यावर पडदा टाकला. मॉडेलच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेतली ज्यानंतर मॉडेलचा (Model) मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
सदर प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची (Accidental Death) तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणी/ मॉडेल यमुना नगर सोसायटी, लोखंडवाला येथील निवासी होती. मृत्यूपूर्वी तिनं हॉटेल रुमवर जेवणंही मागवलं होतं. सकाळच्या वेळेत जेव्हा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी रुमची बेल वाजवली तेव्हा मात्र आतून काहीच उत्तर आलं नही.
Correction | A 30-year-old model died by suicide, her body was found hanging from a fan in a hotel room in Andheri area of Mumbai, Versova police registered a case under ADR and started further investigation. Police also recovered a suicide note* on the spot: Mumbai Police
— ANI (@ANI) September 30, 2022
हॉटेलमधून लगेचच पोलिसांना बोलवण्यात आलं आणि मास्टर कीनं दरवाजा उघडण्यात आला. रुममध्ये प्रवेश करताच समोर असणारा तिचा मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला.