ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतणार मग सर्वसामान्यांच्या प्रश्नावर का नाही? : मनसे

मनसेची शिवसेनेवर टीका

Updated: Jan 3, 2021, 07:30 PM IST
ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतणार मग सर्वसामान्यांच्या प्रश्नावर का नाही? : मनसे title=

देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : ईडीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरतेय  ईडीची नोटीस आली की शिवसेना भवनात बैठका घेतल्या जातात. मग वाढीव वीज बिलाविरोधात,शाळांच्या वाढीव फी विरोधात इतर मुद्द्यावर शिवसेना रस्त्यावर का उतरत नाही ? असा सवाल मनसेने केला आहे.

लोकांसाठी न काम करणारे हे दुर्दैवी सरकार आहे. अशी टीका मनसे नेते मनोज चव्हाण यांनी शिवसेनेवर केली आहे. पाच तारखेला संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. यावेळी शिवसेना ईडी विरोधात आंदोलनाच्या तयारीत आहे. यावरून मनसेने शिवसेनेवर टीका केली आहे.

'तर शिवसेना रस्त्यावर उतरणार ह्या बातम्या चुकीच्या आहेत.'असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

'रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू. पण या कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला?. शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो.' असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.