सत्तेतून बाहेर पडण्याचा शिवसेनेने 'दसरा मुहूर्त'ही टाळला !

आजच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. सरकारविरोधात आंदोलन करणारी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का? याबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते.

Updated: Sep 30, 2017, 10:14 PM IST
सत्तेतून बाहेर पडण्याचा शिवसेनेने 'दसरा मुहूर्त'ही टाळला ! title=

मुंबई : आजच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. सरकारविरोधात आंदोलन करणारी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का? याबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते.

मात्र, भाजप सत्तेतून बाहेर पडण्याचा शिवसेनेने दसरा मुहूर्तही टाळला.  'निर्णया'ची जवळ आलेली वेळ पुढे ढकलली. ५४ मिनिटे केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नावाने बोटं मोडली. 

गेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली होती, ' मंदिर वही बनायएंगे...पर तारीख नही बताएंगे...' 

यावेळी मात्र विधानात थोडा फरक जाणवला...'सत्तासे बाहर जरूर निकलेंगे.....पर तारीख नाही बताएंगे..'