राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती साजरी

तिथीनुसार आज राज्यभर शिवजयंती साजरी होतीये.. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शिवशाही अवतरली.. 

Updated: Mar 4, 2018, 12:08 PM IST
राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती साजरी title=

मुंबई : तिथीनुसार आज राज्यभर शिवजयंती साजरी होतीये.. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शिवशाही अवतरली.. 

शिवरायांच्या पुतळ्यासमोर रायगड किल्लयाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आलीये.. एकाबाजूला शिवरायांची मेघडंबरी आणि समाधी असा भव्य सेट तयार करण्यात आलाय.. 

भारतीय कामगार सेनेकडून यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल...विमानतळ परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पुजन करण्यात आलं.. 

या कार्यक्रमाला शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसंच शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते.. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप सरकार आणि जीव्हीकेला इशारा दिला.