मुंबई मेट्रो भूखंडावरुन शिवसेना-भाजप आमने-सामने

महानगरपालिकेतल्या सुधार समितीच्या बैठकीमध्ये मेट्रोला देण्यात आलेल्या भूखंड प्रस्तावावरुन, शिवसेना भाजप आमने सामने आले.

Updated: Jul 20, 2017, 08:06 PM IST
मुंबई मेट्रो भूखंडावरुन शिवसेना-भाजप आमने-सामने title=

मुंबई : महानगरपालिकेतल्या सुधार समितीच्या बैठकीमध्ये मेट्रोला देण्यात आलेल्या भूखंड प्रस्तावावरुन, शिवसेना भाजप आमने सामने आले.

अंधेरीमधला मलःनिस्सारण केंद्रसाठी आरक्षित भूखंड मेट्रो २ साठी देण्याचा प्रस्ताव होता. त्याला शिवसेनेनं विरोध केला. सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला. त्यावर अक्षयपात्र या बाहेरुन आलेल्या कंपनीला भूखंड देता, मग मुंबईच्या हिताच्या मेट्रो प्रकल्पासाठी भूखंड द्यायला विरोध का करता, असा सवाल यावर भाजप नगरसेवकांनी केला. 

तर शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून, आधीच दुस-या प्रकल्पासाठी आरक्षित असलेला भूखंड मेट्रोसाठी दिला जाणार नसल्याचं सांगत, शिवसेनेनं हा प्रस्ताव फेटाळून लावला.