मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लोकसंख्यावाढीच्या संकटाचा उपस्थित केलेला मुद्दा आता शिवसेनेने उचलून धरला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रलेखातून यासंदर्भात भाष्य करण्यात आले. या अग्रलेखात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना कुटुंब लहान ठेवण्याचा दिलेला सल्ला योग्यच आहे.
परंतु, देशातील एक मोठा वर्ग कुटुंबाचा आकार आणि लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम याबद्दल बेफिकीर असल्याचे सांगत शिवसेनेने मुस्लिम समाजाकडे अंगुलीनिर्देशन केले आहे.
धर्मांध मुस्लिम हे 'हम दो, हमारे पचीस' या मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाहीत. छोटे कुटुंब म्हणजेच देशभक्ती असे पंतप्रधान म्हणाले असले तरी देशातील मुस्लिम त्यापासून बोध घेणार का?, असा सवाल 'सामना'तील अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
मोदी लवकरच घेणार 'हा' मोठा निर्णय; लाल किल्ल्यावरील भाषणात दिले संकेत
७३व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी यांनी देशातील वाढत्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली. लोकसंख्या वाढ नियंत्रणात आणण्याची गरज आहे. भारतात लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ येणाऱ्या पिढ्यांसाठी अडचणी निर्माण करते आहे. या देशातील एका वर्गाला या समस्येची जाणीवही आहे. त्यामुळे अपत्य जन्माला घालण्याआधी ते सारासार विचार करतात. परंतु, आता सर्वांनीच यावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले होते.
स्वयंप्रेरणेने लोक कुटुंब नियोजन करत असतील तर ते स्वत:बरोबर देशाचेही भले करत असतात. ती देखील एक प्रकारची देशभक्तीच असल्याचेही मोदींनी यावेळी म्हटले होते.
मोदींची मोठी घोषणा; लष्कराच्या तिन्ही दलांचे नेतृत्त्व एकाच व्यक्तीकडे