मुंबई : नारायण राणे यांनी भाजपकडून राज्यसभेसाठी उमेवारी अर्ज भरला आहे. पण आता याच मुद्द्यावरून शिवसेनेचा नारायण राणे आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजपकडून देण्यात आलेल्या नारायण राणे यांच्या राज्यसभा उमेदवारीबद्दल शिवसेनेने घेतला आक्षेप घेतला आहे. शिवसेनेकडून राणेंच्या उमेवारीवरून काही प्रश्न विचारले आहेत. यामुळे शिवसेना आणि भाजप पुन्हा आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत.
राणे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार ? राणेंनी ते अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र् स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला आहे का ? भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्याची पावती राणे यांच्याकडे आहे का ? राणे यांना सदस्यत्व दिले नसेल तर त्यांना राज्यसभेची उमेदवारी कशी दिली ?, असे प्रश्न शिवसेना विधान परिषद गटनेते ऍड. अनिल परब यांनी विचारले आहेत.