शिवसेना पक्षांतर्गत संशय कल्लोळ, पक्षाशी गद्दारी करणारा सुर्याजी पिसाळ कोण..?

अकोल्यातील पराभव शिवसेनेने गांभीर्याने घेतला आहे

Updated: Dec 14, 2021, 05:50 PM IST
शिवसेना पक्षांतर्गत संशय कल्लोळ, पक्षाशी गद्दारी करणारा सुर्याजी पिसाळ कोण..? title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषदेच्या निवडणुकीत (Akola Legislative Council Election) शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरीया (Gopikishan Bajoria) यांना पराभव स्विकारावा लागला. या निवडणुकीत भाजपच्या वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांनी गोपिकिशन बजोरीया यांचा पराभव केला. राज्यात सत्ता असूनही जागा न राखता आल्याने हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

वसंत खंडेलवाल यांनी  गोपीकिशन बाजोरीया यांचा १०९ मतांनी  पराभव केला. विधान परीषदेचे विद्यमान आमदार असूनही गोपीकिशन बाजोरिया यांचा झालेला पराभव शिवसेनेनं (shivsena) गांभीर्याने घेत असून  पक्षांतर्गत चौकशी सुरू केली आहे. 

वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार गोपीकिशन बाजोरीया यांच्या पराभवाला स्थानिक आमदार, जिल्हाप्रमूख आणि स्थानिक खासदार जबाबदार असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातं आहे. लवकरच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) या संदर्भात बैठक घेऊन पक्षांतर्गत कारवाई करणार असल्याची माहीती वरीष्ठ सूत्रांनी दिली आहे.

तीन वेळा विजयी झालेले बाजोरीया पराभूत
अकोला मतदारसंघात 98.30 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) लढत होती.  अकोला, वाशीम व बुलडाणा या तीन जिल्ह्याच्या संयुक्त मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात थेट लढत झाली. मात्र, या निवडणुकीत भाजपने बाजी मारत शिवसेनेला जोरदार धक्का दिला. वसंत खंडेलवाल यांना 438 मत तर शिवसेनेचे (shiv sena) गोपिकीशन बाजोरिया यांना 330 मते मिळाली.  

अकोला महापालिका भाजपकडे असली तरी या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व आहे. या मतदारसंघातून बाजोरीया तीन वेळा विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळीही या बाजोरीया विजयी होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.