Uddhav Thackeray : शिवसेनेत फूट बंडखोर आमदारांनी नाही तर भाजपने पाडली : उद्धव ठाकरे

"भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला संपवायचं, अशा प्रकारे शिवसेना संपवण्याचं काम भाजप करत आहे".

संजय पाटील | Updated: Jul 19, 2022, 05:47 PM IST
Uddhav Thackeray : शिवसेनेत फूट बंडखोर आमदारांनी नाही तर भाजपने पाडली : उद्धव ठाकरे title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेत (Shiv Sena) फुट ही बंडखोरांनी नाही, तर भाजपने (Bjp) पाडली, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. उत्तर भारतीय एकता मंच आणि शिवसेना व्यापारी संघटनेसोबतची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. (shiv sena chief uddhav thackeray critisize to bjp over to mla rebelion in uttar bhartiya ekta munch meeting)

उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

"तुम्ही माझ्या भात्यातील कितीही बाण न्या. पण ते बाण चालवण्यासाठी धनुष्य तर लागेल ना. पण हे धनुष्य मात्र माझ्याकडेच आहे हे लक्षात ठेवा", असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

"भाजपच शिवसेना संपवतेय"

"भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला संपवायचं, अशा प्रकारे शिवसेना संपवण्याचं काम भाजप करत आहे. त्यामुळे सतर्क राहा", असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिला.

थोड्याच वेळात जिल्हाप्रमुखांसोबत बैठक

दरम्यान एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी बैठकीचा सपाटा लावला आहे. थोड्याच वेळात मातोश्रीवर उद्धव ठाकरे हे जिल्हाप्रमुखांसोबतच्या बैठकीला संबोधिक करणार आहेत. विशेष म्हणजे ही या महिन्याभरातील जिल्हाप्रमुखांसोबतची चौथी बैठक आहे.