Eknath Shinde : रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी गूड न्यूज, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने (Eknath Shinde Government) रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी (Auto Taxi Drivers) मोठा निर्णय घेतला आहे.

Updated: Jul 19, 2022, 05:08 PM IST
Eknath Shinde : रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी गूड न्यूज, शिंदे सरकारचा मोठा निर्णय title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे :  राज्यात राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडी सुरू आहेत. त्यातच आता राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात लवकरच रिक्षा-टॅक्सी चालकमालक संघटना कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी झी 24 तासशी बोलताना ही माहिती दिली. (eknath shinde government give big decisions for auto taxi drivers and prostitute womens)

शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदेना साथ दिली. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या आमदारांवर सडकून टीका  केली. गुलाबराव पाटील यांची पानपट्टीवाला, तर संदीपान भुमरे यांचा वॉचमॅन असा उल्लेख करत टीका केली होती. तर वेश्या अशीही टीका केली. ही टीका एकनाथ शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली.

त्यामुळे आता रिक्षा-टॅक्सी चालकमालक संघटनेसोबत पानवाला, वॉचमन, तसच वेश्याव्यवसाय करणा-यांसाठी कल्याणकारी मंडळांची स्थापना केली जाईल अशी माहितीही सामंत यांनी दिलीय.

उदय सामंत काय म्हणाले?  

"शिंदे गटावर खालच्या पातळीवर टिका करण्यात आलीय. रिक्शावाला, पाणवला,वाचमन, वैशा व्यवसाय, असे बोलण्यात आले. ती टिका जिव्हारी लागली त्याचे उत्तर आम्ही या सर्व घटाकांसाठी मंडळ काढून या घटकांचा विकास करणार आहोत", अशी घोषणा सामंतांनी केली.

"पाहिले रिक्शा चालकमालक व टैकशी चलाकमालक संघटना कल्याणकारी मंडल स्थापना करणार. राज्यात जवळपास साडेआठ लाख रिक्शा तर एक लाख तीस हजार टैक्सी आहेत त्या सर्वान यात सामिल करणार आहोत. या माध्यमतून अनेक पद्धतिची मदत आम्ही देणार आहोत. या माध्यमातून मुलांच्या शिक्षणसाठी,  महिलांच्या प्रसूतिसाठी आर्थिक मदत, 60 वर्षवरील लोकाना पेन्शन, नविन वाहन घेण्यासाठी आर्थिक मदत, इन्शुरन्स आणि इस्पितल मदत मिळणार असल्याचंही सामंतांनी नमूद केलं.

तसेच यानंतर पानवाला, वॉचमन आणि वेशव्यावासायिंकासाठीही मंडल काढणार असल्याचंही सामंतांनी सांगितलं. दरम्यान या घोषणेनंतर रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.