Uddhav Thackeray : शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाला नवी भरारी देण्यासाठी आणि शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.  

Updated: Jul 16, 2022, 06:58 PM IST
Uddhav Thackeray : शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय title=

मुंबई :  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला (Shiv Sena) खिंडार पडलंय. आमदारांनंतर विविध महापालिकेतील नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला. आता तर शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही आपला दावा सांगितलाय. त्यामुळे शिंदेच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाला नवी भरारी देण्यासाठी आणि शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. (shiv sena chief uddhav thackeray announced his maharashtra tour for party expansion after eknath shinde rebel)

उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात राजकीय नुकसान झालंय. संघटनात्मक पातळीवरही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे पक्षाला नवसंजीवणी देण्यासाठी उद्धव यांनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरे या महाराष्ट्र दौऱ्यात पक्षाला मजबुत करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरणार आहेत. संघटनात्मक पातळीवर  कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावेही घेणार आहेत. 

मातोश्रीवर बैठकींचा सपाटा 

दरम्यान राज्यातील राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे सातत्याने मातोश्रीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह बैठका घेत आहेत. त्यामुळे आता ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.