कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. पोलिसांनी शिवसैनिकांनी संरक्षण का दिलं नाही, असं सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना केला. मुंबईत भायखळ्यात गुरुवारी 14 जुलैला रात्री 2 शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. (shiv sena chief uddhav thackeray aggresive on police over to unknown people attack on 2 shiv sainik at yesterday 14 july night at byculla)
"शिवसैनिकांचं रक्त न सांडण्याचं मी आव्हान करतोय. मात्र असं होत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. जीवाशी येत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. कारवाई झालीच पाहिजे. असं राजकारण कधी झालं नव्हतं. तुम्ही राजकारणात पडू नका", असंही ठाकरे यांनी पोलिसांना सांगितलं.
गुरुवारी रात्री भायखळ्यात रात्री 2 शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला केला गेला. अज्ञातांकडून शिवसेना विभाग क्रमांक 11 मधील उपविभाग प्रमुख आणि भायखळा विधानसभा मतदारसंघातील समन्वयक यांच्यावर हा हल्ला झाला. हे हल्लेखोर दुचाकीवरुन आले आणि तलवारीने हल्ला केला. मात्र दैव बलवत्तर म्हणून हे दोघे वाचले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुखांनी शाखेला भेट दिली. यावेळेस ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच या पदाधिकाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याने यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं. तसेच हल्लेखोरांवर कारवाई करावी, असंही ठाकरे म्हणाले.
तसेच शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागता कामा नये. पोलिसांनी राजकारणात पडू नये. शिवसैनिकांच्या जिवावर येणार असेल तर खपवून घेणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. दरम्यान या सर्व प्रकाराची पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.