Pornography case: Raj Kundra च्या जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी तारीख पे तारीख; शिल्पाही संशयाच्या भोवऱ्यात

दर दिवसागणिक पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्राच्या अडचणींत वाढ 

Updated: Jul 30, 2021, 03:53 PM IST
Pornography case: Raj Kundra च्या जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी तारीख पे तारीख;  शिल्पाही संशयाच्या भोवऱ्यात  title=
संग्रहित छायाचित्र

Pornography case: पॉर्नोग्राफी केस प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा ( raj kundra) याच्या अडचणी दिवसागणिक वाढू लागल्या आहेत. राज कुंद्रा याच्या वकिलांमार्फत वारंवार त्याच्या जामीनाची मागणी करण्यात येत आहे. 27 जुलै रोजी राजला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ज्यानंतर त्याच्या जामीनाची याचिकाही फेटाळण्यात आली होती. ज्यावर आता 2 ऑगस्ट रोजी सुनावणी केली जाणार आहे. 

मुंबई सत्र न्यायालयाकडून 2 ऑगस्ट रोजी, त्याच्या जामीनाच्या याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे. आज वेळेअभावी न्यायालयानं हा निर्णय पुढच्या तारखेसाठी राखून ठेवला. दर दिवसागणिक पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्राच्या अडचणी वाढत असल्यामुळं सातत्यानं त्याच्याकडून जामीनाची मागणी करण्यात येत आहे. 

19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या पतीला त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. ज्यानंतर त्याच्यावर कलम 292, 293 सूचना प्रौद्योगिकी अधिनियम अंतर्गत कलम 67, 67A अन्वये आरोप लावण्यात आले होते. राज कुंद्रा याच्यावर लावल्या जाणाऱ्या आरोपांची साखळी ही दिवसेंदिवस आणखी मोठी होत चालली आहे. ज्यामध्ये SEBI नंही त्याच्यावर 3 लाखांचा दंड लावला आहे. 

Pornography case: राज कुंद्रानंतर बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबई कोर्टाचा मोठा दणका

 

शिल्पा शेट्टीवरही संशयाची तलवार 
सध्या (shilpa shetty) शिल्पा शेट्टीचीही पोलीस कसून चौकशी करत आहेत. तीसुद्धा या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. किंबहुना असंही म्हटलं जात आहे, की ज्या अकाऊंटमध्ये पॉर्नोग्राफी व्यवसायातून येणारा पैसा गोळा होत होता, ते अकाऊंट शिल्पाही वापरत होती. शिल्पा मात्र तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळत असून, आपल्याला या व्यवसायाची कोणतीही माहिती नव्हती अशाच मतावर ती ठाम आहे. राज कुंद्रानं नोंदवलेल्या जबाबानुसारही शिल्पाला त्याच्या या व्यवसायाची कोणतीही माहिती नव्हती, त्यामुळं आता या सर्व प्रकरणाला नेमकं कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.