दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आज ब्रीचकॅण्डी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया आज रात्री ११ वाजता होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान ब्रीचकॅण्डी रुग्णालयात उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार तसेच शरद पवार यांचे जावई सदानंद सुळे हे दाखल झाले आहेत. sharad pawar in breach candy hospital
शरद पवार यांना पोटात दुखण्याचा त्रास होत आहे, स्वादू पिंडाशी संबंधित त्रास असल्याने शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शरद पवार यांच्यावर ३१ मार्चनंतर शस्त्रक्रिया करण्याचा विचार होता, पण अधिक त्रास होत असल्याने आजच शस्त्रक्रिया होत असल्याचं सांगण्यात येत आहे.