माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही- शरद पवार

आता शरद पवार यांच्या डोक्यात नक्की कोणते राजकारण शिजत आहे, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Updated: Nov 11, 2019, 10:27 PM IST
माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही- शरद पवार title=

मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात सोमवारी सकाळपासून मुंबई आणि दिल्लीतील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा सर्वांना पेचात टाकले आहे. दिवसभरातील रंजक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली. तेव्हा माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही, असे सांगून पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर काढता पाय घेतला. त्यामुळे आता शरद पवार यांच्या डोक्यात नक्की कोणते राजकारण शिजत आहे, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सध्या शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरु आहे.

शिवसेनेला मोठा धक्का; सत्तास्थापनेसाठी अधिक वेळ देण्यास राज्यपालांचा नकार

आज सकाळपासून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने राज्यात सरकार स्थापन करणार असल्याची जोरदार हवा होती. शिवसेनेचे शिष्टमंडळ राजभवनात दाखल झाल्यावर राज्यभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जल्लोषालाही सुरुवात केली होती. परंतु, काहीवेळातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्रे राजभवनापर्यंत पोहोचलीच नसल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वांचे चेहर खर्रकन उतरले. 

वातावरण फिरलं, शिवसेनेच्या गोटात चिडीचूप शांतता

यानंतर राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले. आता राष्ट्रवादीकडे आपले संख्याबळ सिद्ध करण्यासाठी २४ तासांचा अवधी आहे. त्यामुळे हे आमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार का?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.