राणीच्या बागेत दोन नव्या पाहुण्यांचा 'करिश्मा'

औरंगाबादहून आले नवे पाहुणे 

Updated: Feb 13, 2020, 11:29 AM IST
राणीच्या बागेत दोन नव्या पाहुण्यांचा 'करिश्मा' title=

मुंबई : औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातून 2 वाघ अखेर मुंबईत दाखल झालेत. मुंबईच्या जिजामाता प्राणी संग्रहालयात आता या वाघांचं वास्तव्य असणारेय. करिष्मा आणि शक्ती अशी या दोन वाघांची नावं आहेत. औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात जास्त वाघ झाल्याने या वाघांना औरंगाबादहून हलवण्यात आलं आहे. 

 पेंग्विनच्या पाठोपाठ आता देश-विदेशातील १०० पक्षी जवळून न्याहाळण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. या सोबतच बिबळ्या, अस्वल, कोल्हा, तरस, कासव यांचेही दर्शन घडणार आहे. पक्ष्यांसाठी तब्बल पाच मजली मुक्त पक्षीविहार बांधण्यात आला असून प्राण्यांसाठी काचेच्या भिंती असणारी अत्याधुनिक दालने उभारण्यात आली आहेत.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीची बाग अनेक वर्षांपासून मुंबईकरांचे आकर्षण आहे. तीन वर्षांपूर्वी बागेत 'पेंग्विन'चे आगमन झाल्यानंतर मुंबईकरांच्या व पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.