Sewri-Worli Elevated Connector: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या अर्ध्या तासांवर येणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (MMRDA) ने चार लेनचा शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर (SWEC) मुळे मुंबईकरांची ट्राफिक कोंडीपासून सुटका होणार आहे. हा कनेक्टर अंतिम टप्प्यात असून लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी सुरु होणार आहे. यातील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) पूर्ण झाल्यानंतर दररोज अंदाजे 35,000 वाहनचालकांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला सिग्नल-मुक्त कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. कनेक्टर हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा भाग असून ट्रॅफिक डिस्पर्सल सिस्टम म्हणून काम करणार आहे.
4.512-किमी-लांब असलेला शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या शिवडी इंटरचेंजपासून सुरू होतो. आचार्य दोंदे मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्गाने जात वरळीजवळील नारायण हर्डीकर मार्गाला मिळतो. इंडियन एक्सप्रेसने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
या मार्गामध्ये उत्तर-दक्षिण विभागातील प्रमुख रस्ते येतात. ज्यामध्ये डॉ. अन्नी बेझंट रोड, गोखले रोड (दक्षिण) सेनापती बापट मार्ग, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे ट्रॅक, डॉ. आंबेडकर रोड, डॉ अर्नेस्ट बोर्जेस रोड, डॉ. एस. एस. राव मार्ग, जी.डी. आंबेकर मार्ग, टोकाशी जीवराज रोड, झकेरिया बंदर रोड (आर. ए. किडवई मार्ग), कॉमेड रामभाऊ देवजी पाटील रोड, हार्बर लाईन ट्रॅक, आणि ईस्टर्न फ्रीवेसह आर ए किडवई मार्गावर दक्षिण आणि उत्तर बाजूला रॅम्प आणि आचार्य दोंदे मार्गावरील अप आणि डाऊन रॅम्प यांचा समावेश होतो.
MTHL ची परिणामकारकता आणि व्यवहार्यता शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टरवर अवलंबून असणार आहे. SWEC MTHL आणि वांद्रे वरळी सीलिंक/कोस्टल रोड जोडणार आहे. दोन सागरी दुव्यांमध्ये डायरेक्ट किंवा सिग्नल-फ्री कनेक्टिव्हिटी असण्यासाठी कनेक्टर काम करेल. नवी मुंबई ते मध्य आणि दक्षिण मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना याचा अधिक फायदा होणार आहे. दररोज कामानिमित्तर प्रवास करणाऱ्यांच्या वेळेची बचत होईल. यासोबतच त्यांना सिग्नल, ट्रॅफिकमुक्त प्रवास करता येणार आहे.
पश्चिम उपनगरातून गोवा आणि दक्षिण भारताकडे जाणारे लांब पल्ल्याचे प्रवासी सायन पनवेल महामार्गाऐवजी वांद्रे वरळी सी लिंक, शिवडी-वरळी कनेक्टर – MTHL वापरण्याची शक्यता आहे. यासोबतच शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्प मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरील सुमारे 15 ते 20% वाहनांना रहदारीसाठी फायदेशीर ठरणार आहे. SWEC मुळे साधारण 45,000 वाहन चालकांना फायदा होणार आहे. कनेक्टर जलद आणि सुरक्षित प्रवास सुलभ करेल. त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत देखील होणार आहे.