Hindustahni Bhau | 'हिंदुस्थानी भाऊ' विकास पाठकला दिलासा, जामीन मंजूर

सोशल  मीडियावर हिंदुस्थानी भाऊ (Hindustahni Bhau) या नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकला (Vikas Pathak) मोठा दिलासा मिळाला आहे.  

Updated: Feb 17, 2022, 04:25 PM IST
Hindustahni Bhau | 'हिंदुस्थानी भाऊ' विकास पाठकला दिलासा, जामीन मंजूर  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  सोशल  मीडियावर हिंदुस्थानी भाऊ (Hindustahni Bhau) या नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकला (Vikas Pathak) मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील (Dharavi) हिंसक आंदोलन प्रकरणी हा दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाने विकास पाठकला जामीन मंजूर केला आहे. हिंदुस्थानी भाऊला धारावीतील हिंसक आंदोलन प्रकरणी 1 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. (session court vikas phatak aka hindustani bhau bail granted in dharavi student agaiation matter)

नक्की प्रकरण काय? 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घराबाहेर आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला हिंदुस्थानी भाऊने हवा दिल्याच्या आरोप करण्यात आला होता.

विकास पाठक यानेच दहावी आणि बारावीच्या मुलांना आंदोलनासाठी चिथावणी दिली, असाही त्याच्यावर आरोप केला गेला. हिंदुस्थानी भाऊच्या व्हीडिओनंतर हे आंदोलन भडकल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली होती.

पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला 1 फेब्रुवारीला अटक केली. त्यानंतर वांद्रे महानगर दंडाधिकारी कोर्टाने हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र अखेर मुंबईत सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानं हिंदुस्थानी भाऊला मोठा दिलासा मिळाला आहे.