रेल्वे महिला कर्मचाऱ्याचा छळ करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक

पश्चिम रेल्वेच्या महिलेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून  मानसिक आणि शारीरिक छळ प्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Updated: May 6, 2021, 11:03 AM IST
रेल्वे महिला कर्मचाऱ्याचा छळ करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक title=
संग्रहित फोटो

वसई : पश्चिम रेल्वेच्या महिलेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून  मानसिक आणि शारीरिक छळ प्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.  दरम्यान, वन कर्मचारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण सारख्या घटनेची पुनरावृत्ती टळल्याची चर्चा सुरु होती. (Senior officer arrested for harassing female Western Railway employee at Mumbai)

पश्चिम रेल्वेच्या सिग्नल विभागात काम करणाऱ्या एका 35 वर्षीय  महिलेने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळणाऱ्या  शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन संबंधित अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करुन  अटक केली आहे. 

राजीव कुमार मंडल असे त्याचे नाव असून महिलेने दिलेल्या तक्रारीत तिच्या वरिष्ठांकडून गेल्या आठ वर्षांपासून तिचा शारीरिक आणि मानसिकछळ केला जात होता. आरोपीने अनेकवेळा महिलेला कामावर असताना मनात लज्जा निर्माण होऊल असे अनेक वेळा कृत्य केले होते. या प्रकरणी या महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठांना या बाबतची माहिती दिली होती. महिलेने माहिती दिल्यानंतर तिच्या तक्रारीची साधी दखल घेतली गेली नाही. तसेच तिला वरिष्ठांकडूनही मदत मिळत नसल्याने अखेर होणाऱ्या त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार दाखल केली. 

ही महिला कर्मचारी वरिष्ठांच्या जाचाला इतकी कंटाळली होती की तिने टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता होती. मात्र, तिने धीर करत दाखवलेल्या धाडसामुळे , आणि पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे तिला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाला आहे. दरम्यान, आरएफओ  दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जसे आत्महत्येचे पाऊल उचलले होते तसेच मलाही आपले जीवन संपवावे लागले असते, अशी भावना पीडित महिला व्यक्त करीत होती. आता वरिष्ठ अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याने तिची त्रासातून सुटका झाली आहे. मात्र, रेल्वेतील या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.