मुंबई: भारतीय स्टेट बँकेकडून बुधवारी निवडक मुदत ठेव योजनांवरील व्याजदर वाढवण्यात आले. व्याजदरात पाच बेसिक पॉइंट्सची वाढ करण्यात आली असून त्यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता एफडीवर ६.८ टक्के व्याज मिळणार आहे. यापैकी काही योजनांचे व्याजदर हे एक ते दोन वर्षे तर उर्वरित योजनांचे व्याजदर दोन ते तीन वर्षांसाठी लागू असतील.
जुलैमध्ये स्टेट बँकेने तो पाच बेसिक पॉइंट्सने वाढवून ६.७५ टक्के इतका केला होता. आता तो परत पाच बेसिक पाँइंट्सने वाढवण्यात आला आहे. एकाच वर्षात दोनदा दरवाढ केली गेल्याचीही पहिलीच वेळ आहे.
दुसरीकडे स्टेट बँकेच्या काही सेवा बंद होणार आहेत. जर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही तर तुमची इंटरनेट बँकिंग सेवा किंवा ऑनलाइन बँकिंग सेवा बंद होऊ शकते. या संदर्भात बँकेकडून कायम नोटिफिकेशन पाठवून ग्राहकांना जागरूक केलं जात आहे. याशिवाय, स्टेट बँकचे मोबाइल वॉलेट SBI Buddy १ डिसेंबरपासून बंद होईल.
जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची शेवटची संधी
जर तुमच्या कुटुंबात कुणी सेवानिवृत्त व्यक्ती असेल आणि त्यांच पेन्शन SBI मध्ये येत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी. 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचा लाइफ सर्टिफिकेट बँकेत जमा करायचे आहे. प्रत्येक पेन्शनधारकांना याबाबत माहिती दिली आहे. सर्टिफिकेट जमा न केल्यास त्यांची पेन्शन थांबवण्यात येईल.
पेन्शन लोनची सुविधा संपणार
एसबीआयकडून पेन्शनर्सला फेस्टिव सिझनमध्ये लोन देण्याची सुविधा सुरू केली होती. ही ऑफर त्या ग्राहकांना होती ज्यांची पेन्शन SBI च्या कोणत्याही शाखेत पेन्शन येते. या अंतर्गत कोणतेही प्रोसेसिंग फी न आकारता लोन मिळत होते. ही सेवा ७६ वर्षांच्या केंद्रीय, राजकीय आणि लष्करातून निवृत्त झालेल्या पेन्शन धारकांकरता असून ही सेवा ३० नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे.