JOB ALERT : SBI recruitment 2021 : स्टेट बॅक ऑफ इंडिया 6348 पदाची मेगा भरती जाहिर

स्टेट बॅक ऑफ इंडिया भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती  

Updated: Jul 7, 2021, 11:52 AM IST
JOB ALERT : SBI recruitment 2021 : स्टेट बॅक ऑफ इंडिया  6348 पदाची मेगा भरती जाहिर title=

मुंबई : SBI recruitment 2021 :- बेरोजगार तरूणासाठी स्टेट बॅक ऑफ इंडियाने तब्बल 6348 जागांसाठी मेगा भरती जाहिर केली आहे. “अप्रेंटीस” या पदाच्या एकूण 6,348 जागा संपूर्ण भारतात भरल्या जाणार आहेत. तर महाराष्ट्रात एकूण 390 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (SBI Apprentice Recruitment 2021: Apply for 6100 posts on sbi.co.in, details here) यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.

स्टेट बॅक ऑफ इंडिया भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती

पद क्रमांक पदाचे नाव पदाची संख्या
01. अप्रेंटीस ( संपूर्ण भारत ) 5,958
02. अप्रेंटीस ( महाराष्ट्र ) 390
एकूण जागा 6,348
शैक्षणिक पात्रता :-

अप्रेंटीस उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर असावा.

वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षापर्यंत ( SC/ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल. )

निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांची परीक्षा ऑगस्ट 2021 मध्ये घेतली जाईल.

अर्ज दाखल करण्याची पध्दत :- अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करावा.

ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता :- ibpsonline.ibps.in

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख :- 26 जुलै 2021.

पदाची जाहिरात :- PDF जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ :- www.sbi.co.in

किती मिळणार स्टायपेंड? 

SBI Apprentice Recruitment 2021  करता नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना एक वर्षांपर्यंत 15000 रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळणार आहे. या उमेदवारांना इतर भत्ते आणि बॅनेफिट्सचा देखील फायदा मिळणार आहे.