मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे अनेक मोठे नेते, आमदार आणि खासदार उपस्थित होते. संजय राऊत काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, महाविकासआघाडीच्या सर्व नेत्यांनी फोन करुन मला पाठिंबा दिला आहे. तुम आगे बढो... असं मला सांगितलं आहे. बाळासाहेबांनी आम्हाला मंत्र दिला होता. की, तुमचं मन साफ आहे तर कोणाच्या बापाला घाबरु नका. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील या दिशेने पक्ष पुढे घेऊन जात आहे.
- कितीही वार केले तर शिवसेना मागे हटणार नाही.
- केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात काय करत आहेत. याबाबत मी उपराष्ट्रपतींनी पत्र लिहिलं आहे.
- भाजप नेते मला या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडण्यासाठी सांगत आहेत. महाराष्ट्रातील सरकार आम्ही पाडू. तुम्ही आम्हाला मदत करा. तुम्ही मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईप करतील.
- काही केले तरी हे सरकार पडणार नाही. नातेवाईकांना त्रास दिला जात आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खोटे हल्ले सुरु आहेत.
- उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं आहे. आधी वस्तूस्थिती लोकांपुढे येऊ दे. महाराष्ट्रात कोण राहतंय हे बघू. बाहेरचे लोकं येऊन आमच्यावर दादागिरी करणार. याआधी असं कधी घडलं नव्हतं.
- मी कधीही चुकीचं काम केलेलं नाही. 20 वर्षाचे बँकेचे स्टेटमेंट घेऊन गेले. माझं गाव अलिबाग. तर माझी जमीन अलिबागमध्येच असेल ना. 50 गुंठे जमिनीचा तपास ईडी करतेय.
- संजय राऊतांच्या विरोधात लिहून देण्यासाठी बेकायदेशीरपण गरीब लोकांना डांबून ठेवलं जातंय.