Sanjay Raut out of Jail : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. (Maharashtra Political News) मात्र ईडीच्या (ED) याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राऊतांच्या जामिनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. राऊतांच्या जामिनावर महिनाभर झालेल्या युक्तिवादानंतर पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. उच्च न्यायालय एका तासात तो निर्णय कसा बदलू शकते, असा सवाल उच्च न्यायालयानं ईडीच्या वकिलांना विचारला. यावर तातडीने सुनावणी घेणे शक्य नाही, असं स्पष्ट केले. त्याचवेळी उच्च न्यायालयाची वेळ संपत आलेली आहे. त्यामुळे उद्या सुनावणी घेण्यात येईल, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना काल गोरेगावमधील पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर तीन महिन्यांनी जामीन मंजूर करण्यात आला. मुंबईतील विशेष न्यायालयाने खासदार राऊत यांना जामीन मंजूर केला. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या (Prevention of Money Laundering Act) संबंधित खटल्यांच्या सुनावणीसाठी नियुक्त केलेले विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर राऊतच्या जामीन अर्जास परवानगी दिली.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राऊत यांना या वर्षी जुलैमध्ये गोरेगावमधील पत्रा चाळीच्या पुनर्विकासासंदर्भात आर्थिक अनियमिततेच्या कथित भूमिकेसाठी अटक केली होती. ते मुंबईतील आर्थर रोड कारागृहात होते. राऊत यांनी त्यांच्या जामीन अर्जात दावा केला होता की, त्यांच्यावरील खटला हा 'सत्तेचा गैरवापर' आणि 'राजकीय सूडबुद्धी' आहे. दरम्यान, दोन्ही बाजु ऐकल्यानंतर न्यायालयाने ईडीची चांगलीच खरडपट्टी काढली. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनी अटक ही बेकायदेशी आहे. प्रमुख आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.