शिवस्मारक आणि बाबासाहेबांच्या स्मारकाविषयी संजय निरूपम म्हणाले....

भाजपचं मुख्यालय मात्र दीड वर्षात बांधलं गेलं, मात्र शिवस्मारक आणि डॉ. आंबेडकर स्मारकाची घोषणा होऊन दोन वर्षे लोटली.

Updated: Feb 19, 2018, 06:28 PM IST
शिवस्मारक आणि बाबासाहेबांच्या स्मारकाविषयी संजय निरूपम म्हणाले.... title=

मुंबई : भाजपचं मुख्यालय मात्र दीड वर्षात बांधलं गेलं, मात्र शिवस्मारक आणि डॉ. आंबेडकर स्मारकाची घोषणा होऊन दोन वर्षे लोटली, मात्र अद्याप कामही सुरु झालेल नाही, अशी टीका करत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. निरूपम यांनी ट्वीट करत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

स्मारकांच्या उभारणीला सुरूवात कधी होणार?- निरूपम

संजय निरुपम यांनी भाजपवर निशाणा साधला आणि म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमीपूजन होऊन २ वर्षे झाली, अद्याप स्मारकाच्या उभारणीसाठी सुरूवातही नाही.

दीड वर्षात भाजपाचं मुख्यालय बांधलं-निरूपम

यावर आणखी पुढे बोलताना निरूपम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनालाही २ वर्षे झाली, तेथेही अजून काम सुरू झालेले नाही. मात्र दिल्लीत अवघ्या दीड वर्षात भाजपच्या अलिशान मुख्यालयाची इमारत उभी राहिली. काल उद्घाटनही झाले. यांचं प्राधान्यक्रम कशाला आहे ते लक्षात येईल.