मुंबई : समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti redkar) राजभवनावर (Rajbhavan) दाखल झाल्या आहेत. सोबत समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे, समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे देखील पोहोचले आहेत. समीर वानखेडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईमुळे ते चर्चेत आले होते. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. (Kranti Redkar meet Governor Bhagat singh Koshyari)
नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर ही वैयक्तिक आरोप केलेत. ज्यामुळे समीर वानखेडे यांचं कुटुंब हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. याआधी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही पत्र लिहिलं होतं.
समीर वानखेडे यांच्यावर आरोपानंतर त्यांच्याकडून आर्यन खानसह काही प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. मात्र ते NCB चे मुंबई झोनल डायरेक्टर म्हणून कायम राहणार आहेत.