मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक आरोप-प्रत्यारोपासोबत, सत्तेची उलथापालथ होत असतांना एक नवीन बाब समोर येत आहे. अलिकडेच भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. हा कार्यकाळ संपताच आगामी राजकीय वाटचालीबद्दल लवकरच घोषणा करणार, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली होती. (sambhaji rajes way to rajya sabha is now easy)
राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी जुलैमध्ये निवडणूक होणार आहे. त्यात भाजपते 2, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ त्या त्या पक्षांकडे आहे.
अशावेळी सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आपण अपक्ष उभे राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याचबरोबर सर्व पक्षांनी आपल्याला मदत करावी असे आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही छत्रपती संभाजीराजेंना देऊ असं शरद पवारांनी नांदेडमध्ये सांगिलतं आहे.छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या करीता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची आणि निवडून येण्यासाठी एकूण 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे.
या करीता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा व्यक्त केलेला आहे.
महाविकास आघाडीकडे एकूण 27 मते शिल्लक राहतात. तसेच पाठिंबा दिलेल्या आमदारांची अपक्ष आमदारांची संख्या मिळून महाविकीस आघाडीकडे 47 मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना निवडूण येण्यासाठी 42 मतांचा आवश्यकता आहे. या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे सहज राज्यसभेवर जाऊ शकतात. असा अंदाज वर्तवला जात आहे.
गुरुवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना संभाजीराजे म्हणाले होते की, 'मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, अपक्ष म्हणून काही दिवसांनी होणारी राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. तसंच आपण एका नव्या संघटनेची स्थापना करत असल्याचंही जाहीर केलं आहे. 'स्वराज्य' हे माझ्या नव्या संघटनेचं नाव असून या संघटनेचा प्रसार करण्यासाठी मी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे', असंही संभाजीराजे म्हणाले होते.