गृहमंत्र्यांची चाल हेरत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठा पर्दाफाश; गुजरात, औरंगजेब अन्... तोफ डागत म्हटलं तरी काय?

आगामी Vidhansabha Election च्या धर्तीवर सध्या सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, भाजपच्या रणनितीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.   

सायली पाटील | Updated: Sep 27, 2024, 08:55 AM IST
गृहमंत्र्यांची चाल हेरत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठा पर्दाफाश; गुजरात, औरंगजेब अन्... तोफ डागत म्हटलं तरी काय?  title=
samana editorial shivsena thackeray party slams amit shah and modi government

Vidhansabha Election 2024 : देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांपैकी एक म्हणजे (Maharashtra Political News ) महाराष्ट्रातील सत्ताकारण. राज्यात कोणाची सत्ता किती मताधिक्यानं टीकते इथपासून ही सत्ता मिळवताना सत्ताधाऱ्यांची ओढाताण होते की त्यांना जीवाचा आटापिटा करून विजय मिळवावा लागतो यावरच अनेक गोष्टी किंबहुना जनतेचा एकंदर कलही लक्षात येतो. लोकसभा  निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकारणात एकंदर कोणाची हवा आहे ही बाब लक्षात आली आणि केंद्रात सूत्र हाताळणाऱ्या भाजपनं विधानसभा निवडणुकीत झाल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही यासाठी कंबर कसली. 

'सामना' या ठाकरेंच्या (Shivsena) शिवसेनेच्या मुखपत्रात अग्रलेखाच्या माध्यमातून हीच बाब अधोरेखित करण्यात आली आहे. जिथं, थेट केंद्रीय गृहमंत्री (Amit shah) राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर आखत असलेली चाल ओळखत त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्वालाच आव्हान देण्याचे डोहाळे लागल्याचं भाष्य करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर शाह यांना लागलेले हे डोहाळे पुरवण्याचं काम शिंदे सरकारच्या वतीनं केलं जात असल्याचं म्हणत ठाकरेंकडून या संपूर्ण राजकीय गोळाबेरीजीवर सणसणीत टीका करण्यात आली आहे. 

अग्रलेखात काय म्हटलंय? 

गृहमंत्री अमित शहा यांनी नाशकातील त्यांच्या दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला की, ‘‘फोडा, झोडा; पण निवडणुका जिंका.’’ महाराष्ट्रात पराभवाच्या भीतीने भाजपचे हातपाय थरथरू लागले आहेत व स्वतः गृहमंत्री शहादेखील महाराष्ट्र हातचा जातोय या भयाने खचले आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना फोडा. त्यांचे बुथ स्तरावरील कार्यकर्ते फोडा व या पक्षांचा पाया जमीनदोस्त करा. काहीही करा, पण निवडणुका जिंका, असे अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे सांगितले. शहा यांची भाषा लोकशाहीला धरून तर नाहीच, पण किमान सभ्यपणाचीदेखील नाही. महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार, खासदार वगैरे पन्नास-पन्नास कोटींना सरळ विकत घेतले गेले. त्यातील काही जणांना ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा दबाव टाकून फोडले. देशाचे गृहमंत्री अशा भ्रष्ट लोकांच्या मदतीने महाराष्ट्रात घटनाबाहय़ सरकार चालवत आहेत व त्यांना संरक्षण देण्यासाठी पराकाष्ठा करीत आहेत. 40–40 आमदार फोडूनदेखील महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या मिंधे टोळीचा दारुण पराभव लोकसभा निवडणुकीत झाला. मऱ्हाटी जनतेने मोदी-शहांच्या भ्रष्ट राजकारणाला अक्षरशः लाथाडले. म्हणजे त्या शहा-मोदींनी फांद्या छाटल्या तरी दोन्ही पक्षांचे बुथ स्तरावरील कार्यकर्ते व मतदार ‘पवार-ठाकरे’ यांच्या बरोबरच राहिले.' 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : परतीच्या पावसाचा दणका; मुंबईत मुसळधार; दिवसभरात कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग? 

मणिपूर हिंसा, काश्मीरमधील अशांतता, महिलांवरील वाढते अत्याचार आणि तत्सम अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनी देश होरपळत असतानाच केंद्रातील महत्त्वाच्या पदांवर असणारी मंडळी मात्र महाराष्ट्रातील निवडणूक आढाव्यावर वेळ घालवतात ही बाब अधोरेखित करत अग्रलेखातून त्यावर मिश्किल सूरात टीका करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेवर यावेळी विश्वास दाखवत राज्यात फोडा आणि झोडाच्या रणनितीला वाव मिळणार नाही असाही निर्धार अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला.