भाजीविक्रेत्याने सलमानकडे मागितलेली 5 कोटींची खंडणी! समोर आलं धक्कादायक कारण; अटकेनंतर म्हणाला, 'मी...'

Salman Khan: सलमान खानला धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर धमकी दिली होती. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 24, 2024, 09:51 AM IST
 भाजीविक्रेत्याने सलमानकडे मागितलेली 5 कोटींची खंडणी! समोर आलं धक्कादायक कारण; अटकेनंतर म्हणाला, 'मी...' title=
salman khan threat message mumbai police arrests vegetable seller

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी 24 वर्षांचा असून तो भाजीविक्रेता आहे. झारखंडच्या जमशेदपूर येथील तो रहिवाशी आहे. बुधवारी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शेख हुसैन असं आरोपीचे नाव आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्णोई गँगने सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. तसंच, सलमान खानलादेखील धमकी देण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज आला होता. त्यात अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला होता. 

धमकी देणाऱ्या आरोपीने सलमान खानला इशारा दिला होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्णोईचे प्रकरण सोडवण्यासाठी 5 कोटी रुपये दिले नाही तर त्यांची अवस्थाही बाबा सिद्दीकीसारखी होईल, अशा आशयाचा मेसेज त्याने केला होता. मुंबई ट्रॅफिक पोलिसांना 17 ऑक्टोबर रोजी हा मेसेज आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपास सुरू झाल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी हेल्पलाइनला त्याच नंबरवर आणखी एक मेसेज केला. तेव्हा त्या मेसेजवर रिप्लाय आरोपीकडूनच उत्तर आलं होतं. आरोपीच्या म्हणण्यानुसार, 'चुकून हा मेसेज पाठवण्यात आला होता' 

मेसेज पाठवणाऱ्याला तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी यावेळी जमशेदपूरच्या स्थानिक पोलिसांची मदत घेतली होती. वरळी पोलिसांचे पथक ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी करत आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा भाजीविक्रेता आहे. 

दरम्यान, काळविट प्रकरणी सलमान खानने माफी मागावी, अशी लॉरेन्स बिश्णोईची मागणी आहे. यावरुनच बिश्णोई गँगकडून सलमानला धमकी देण्यात येत आहे. याच कारणामुळं गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार करण्यात आली होती. 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यात घनिष्ठ संबंध होते. या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. मात्र, तरीही सलमान खान बिग बॉस, सिकंदर आणि सिंघम अगेनसाठी शुटिंग करत आहेत.