भाच्याशी जुळलं मामीचं प्रेम, दोघांकडून झाला तिच्या नवऱ्याच्या गेम; अखेर पोलिसांनी असा साधला दोघांवर नेम

या दोघांनीही नसीम खान याला मारुन घरातील पलंगा खाली लपवून ठेवलं, परंतु...

Updated: Jul 21, 2022, 05:22 PM IST
भाच्याशी जुळलं मामीचं प्रेम, दोघांकडून झाला तिच्या नवऱ्याच्या गेम; अखेर पोलिसांनी असा साधला दोघांवर नेम title=

मुंबई : अंधेरी पूर्व येथे नुकत्याच झालेल्या एका तरुणाच्या हत्येचे प्रकरण मुंबई पोलिसांनी सोडवले आहे. या प्रकरणात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह त्याच्याच घरात सापडला. ज्यामुळे त्याचा खून घरीच कोणीतरी केला असणार हे नक्कीच. परंतु त्याला कोणी आणि का मारले हे मुंबई पोलिसांनी शोधून काढलं आहे. या प्रकरणे पोलिसांनी मृतकाची बायको आणि त्याच्या भाच्याला अटक केली आहे.

रुबिना खान असे आरोपी पत्नीचे नाव असून ती अंधेरीच्या साकीनाका भागात पती नसीम खानसोबत भाड्याच्या घरात राहत होती. तर अन्य आरोपीचे नाव सैफ खान आहे. या दोघांनीही नसीम खान याचा मारुन घरातील पलंगा खाली लपवून ठेवलं आहे.

18 जुलै रोजी ही घटना उघडकीस आली, जेव्हा मृतदेहाचा दुर्गंध सोसायटीत पसरला, त्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली.

त्यावेळी पोलिसांना असे लक्षात आले की, या तरुणाला स्टीलच्या पिगी बँकेने मारले गेले आणि नंतर उशीने त्याचा गळा आवळून त्याला संपवलं गेलं.

असा झाला खुलासा

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी नवरा-बायको दोघांचे कॉल रेकॉर्डस तपासले असता, बायकोचे तिच्या पुतण्याच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी पुतण्याला अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात देण्यासाठी बोलावले. तेव्हा या पुतण्याच्या मानेवर ओरखडे असल्याचे पोलिसांना दिसले, त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि रुबिनासोबतचे नातेही सांगितले.