बिल्डरकडून धमक्या, सायरा बानो यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी, अभिनेत्री सायरा बानो यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.

Updated: Dec 13, 2017, 07:11 PM IST
बिल्डरकडून धमक्या, सायरा बानो यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार  title=

मुंबई : ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी, अभिनेत्री सायरा बानो यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.

बिल्डर समीर भोजवनी हा दिलीप कुमार यांचं पाली हिल, वांद्रे इथलं घर बळकावण्याचा प्रयत्न करतोय, अशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय. 

भोजवानीकडून वारंवार धमक्या येत असल्याचा आरोप सायरा बानोंनी केलाय. भोजवनीनं जागेची खोटी कागदपत्रं केल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधांचा गैरवापर करून बिल्डर दबाव आणत असल्याची टीकाही त्यांनी केली.

पाली हिलमधील जागेचा वाद 

- 1953 ला दिलीप कुमार यांनी हसन लतीफ यांच्याकडून 1 लाख 40 हजार रुपये देऊन जागा खरेदी केली होती

- 2008 ला जागेचा पुनर्विकास करण्यासाठी परजिता डेव्हलपर्स सोबत करार केला

- पण 30 ऑगेस्ट 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला कि  हि जागा डेव्हलपर्सनी दिलीप कुमार यांना पुन्हा परत द्यावी

- 12 सप्टेंबर 2017 ला सायरा बानो यांनी जागेचा ताबा घेतला

- पण वांद्रे पाली हिल मधील बिल्डर समीर भोजवानी यांनी खोटी कागदपत्रे तयार करून सदर जागा आपली असल्याचा दावा केल्याचा आरोप सायरा बानो यांनी केलाय

- आणि आता जागा बळकवण्यासाठी भोजवनी यांचे प्रयत्न होत असल्याचा आरोप सायरा बानो यांचा आहे. भोजवनी यांच्याकडून धमक्या येत असल्याचाही बानो यांचा आरोप आहे. तशी लेखी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय.

- मुंबई पोलीस दलाचा आर्थिक गुन्हे तपास विभाग प्रकरणी पुढील कार्यवाही करीत आहेत