New Year 2023 : थर्टी फस्टचे सेलिब्रेशन देवाच्या दारात, साई मंदिर रात्रभर खुलं राहणार; सिद्धिविनायकाचं पहाटे 3 वाजल्यापासून दर्शन

New Year 2023 : थर्टी फस्ट सेलिब्रेशन देवाच्या दारात करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. शिर्डीचे  साई मंदिर 31  डिसेंबरला रात्रभर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. तर, मुंबईतील सिद्धिविनायकाचं 1 जानेवारीला पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन सुरु होणार आहे.   

Updated: Dec 29, 2022, 01:08 PM IST
New Year 2023 : थर्टी फस्टचे सेलिब्रेशन देवाच्या दारात, साई मंदिर रात्रभर खुलं राहणार; सिद्धिविनायकाचं पहाटे 3 वाजल्यापासून दर्शन title=

New Year 2023  : 2022 हे वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण थर्टी फस्ट सेलिब्रेशनचे (Thirty First Celebration) प्लान आखत आहेत. बरेच जण हे देव दर्शन करत सरत्या वर्षाला निरोप देऊन नविन वर्षाचे स्वागत करतात. थर्टी फस्ट सेलिब्रेशन देवाच्या दारात करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. शिर्डीचे  साई मंदिर (Saibaba Temple of Shirdi ) 31  डिसेंबरला रात्रभर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. तर, मुंबईतील सिद्धिविनायकाचं (Mumbai Siddhivinayak Temple) 1 जानेवारीला पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन सुरु होणार आहे.   

शिर्डीचे  साई मंदिर 31  डिसेंबरला रात्रभर भाविकांसाठी खुलं राहणार 

31 डिसेंबरला शिर्डीचं साईमंदिर रात्रभर सुरू राहणार आहे.  नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळांवर गर्दी होते. साईभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी साई संस्थानकडून चोख नियोजन करण्यात आलंय. 31 डिसेंबरला अंदाजे तीन ते साडे तीन लाख भाविक साईनगरीत येतील असा अंदाज आहेत. त्यामुळेच साईभक्तांसाठी मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे.  साईभक्तांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील मागविण्यात आला असल्याची माहिती साईसंस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. 

नवं वर्षाच्या पहिल्या दिवशीच घ्या बाप्पाचे दर्शन

अनेक जण मुंबईतील सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन नविन वर्षाची सुरुवात करताना. केवळ मुंबईच नाही तर अनेक ठिकाणचे भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात.  नवं वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे सव्वा तीनपासून सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन मिळणार आहे. लाखो भाविक नवं वर्षाची सुरुवात सिद्धीविनायकाच्या दर्शनानी करतात. त्यामुळे मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

थर्टी फस्टचे सेलिब्रेशनवर कोरोनाची दहशत

सध्या चीनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. यामुळे भारतातही याचे सावट पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. सरकारकडून खबरदारी घेण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातही अनेक मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क घालण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.