ट्रम्प यांच्या 'अहमदाबाद' दौऱ्यावर सामनातून सवाल

सामनातून उपस्थित करण्यात आले प्रश्न

Updated: Feb 24, 2020, 11:21 AM IST
ट्रम्प यांच्या 'अहमदाबाद' दौऱ्यावर सामनातून सवाल title=

मुंबई : भारत दौऱ्यादरम्यान ते अहमदाबादला भेट देणार आहेत. तिथं त्यांच्या स्वागतासाठी 'केम छो ट्रम्प' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीच्या पार्श्वभूमीवर शहरात रंगरंगोटीची कामं सुरू आहेत. झोपड्यांसमोर भिंती उभारल्या जात आहेत. या सर्व घडामोडींवर शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'तून उपरोधिक भाष्य करण्यात आलं आहे. मुळात ट्रम्प यांना दिल्लीत आधी न उतरवता थेट अहमदाबादेत उतरवून केंद्र सरकारला नक्की कोणता संदेश द्यायचा आहे, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत. या दौऱ्यासाठी अहमदाबादमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मोटेरा स्टेडियम सज्ज आहेत. ट्रम्प हे विमानतळावरून निघाल्यानंतर रोड शो दरम्यान त्यांचं रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोकं स्वागत करण आहेत. अहमदाबादसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करत आहेत. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भोजन समारंभासाठी काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. २५ फेब्रुवारीला हा समारंभ होणार आहे. यात लोकसबेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आणि राज्यसभेतील काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आमंत्रण नसल्याने टीका होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. रोड शोच्या मार्गावरचे रस्ते सजवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज साबरमती आश्रमाला देखील भेट देणार आहेत. त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी साबरमती आश्रम सज्ज झाला आहे. इथं मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.