मॅरेथॉन शर्यत पडली महागात, चोरट्यांनी मोबाईल केले लंपास

 पवईच्या आयआयटी केम्प्स मध्ये फिटिझन्स या संस्थेतर्फे ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती.

Updated: Aug 26, 2018, 03:43 PM IST
मॅरेथॉन शर्यत पडली महागात, चोरट्यांनी मोबाईल केले लंपास title=

मुंबई: पवई आयआयटीमध्ये रविवारी पहाटे मॅरेथॉनसाठी आलेल्या लोकांच्या पार्किंग केलेल्या गाड्या चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी गाड्या फोडल्यानंतर लॅपटॉप, मोबाईल, पाकीट तसेच महागडे मोबाईल लंपास केले. तसेच काही जणांच्या एटीएम कार्डमधूनही परस्पर रक्कम काढण्यात आल्याचे समजते. 

 पवईच्या आयआयटी केम्प्स मध्ये फिटिझन्स या संस्थेतर्फे ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. परंतु याबाबत पवई पोलीस ठाण्याला कोणतीही माहिती दिली गेली नव्हती. संस्थेतर्फे गाड्यांना कोणतीही पार्किंग देण्यात आली नव्हती. सध्या पवई  पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.