रितेश-जेनेलियाने 'या' निर्णयासाठी मानले महाराष्ट्र सरकारचे आभार

या कारणामुळे मानले आभार 

Updated: Mar 9, 2021, 09:00 AM IST
रितेश-जेनेलियाने 'या' निर्णयासाठी मानले महाराष्ट्र सरकारचे आभार  title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारचा (Maharashtra Assembly Budget 2021)  अर्थसंकल्प सोमवारी उपमुख्यंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला. यामुळे अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया डिसूझो- देशमुख ( Genelia D'souza Deshmukh ) यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आहे. (Eastern Freeway named Vilasrao Deshmukh )

अभिनेत्री जेनेलिया डिसूझा आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. जिथे त्यांना महाराष्ट्र आघाडी सरकारचे आभार मानले आहे. 

या कारणासाठी मानले आभार 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

मुंबईत वाहतूक कोंडी हा महत्वाचा मुद्दा आहे. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एक संकल्पना मांडली होती. या संकल्पनेत विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पूर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. त्यांनी या मांडलेल्या संकल्पनेमुळेच हा मार्ग तयार झाला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

या मार्गाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी २०२० साली पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीबाबत दखल घेत. सोमवारी अर्थसंकल्पात ही घोषणा जाहीर करण्यात आली. या मार्गाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आले. 

'ईस्टर्न फ्री वे' ची माहिती 

ईस्टर्न फ्री वे ची लांबी १६.८ कि.मी आहे. दक्षिण मुंबईतील पी डीमोलो रोडपासून ते चेंबुर येथील पूर्व द्रूतगती मार्गास हा मार्ग जोडला जातो. हा रस्ता बीएमसीच्या ताब्यात असून याला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आले.