प्रशांत अंकुशराव , झी 24 तास, मुंबई : मुंबईला हादरवणारी घटना उपनगरातील साकीनाका परिसरात घडली आहे. एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या विकृताने पीडितेच्या गुप्तांगात सळई टाकून वार केला. ही घटना 9 सप्टेंबरला रात्री 3 च्या दरम्यान घडली. या संतापजनक घटनेमुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान पीडितेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं असून त्या विकृताला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे. (Recurrence of Nirbhaya incident in Mumbai victim woman in critical condition 1 arrested)
नक्की काय घडलं?
पोलीस कंट्रोल रुमला 9 ऑगस्टच्या मध्यरात्री 3 वाजता फोन आला. त्या फोनवरुन एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार देण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. अधिकारी आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पोहचल्यानंतर पोलिसांनी पीडिता जखमी अवस्थेत सापडली. त्यानुसार पोलिसांनी पीडितेला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयत दाखल केलं. पीडिता गंभीर जखमी असून प्रकृती चिंताजनक आहे. तसेच पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर सळीने मारल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मोहन चोहान या आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.