फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून ७ कोटी १९ लाखांचा दंड वसूल

मुंबई उपनगरी रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच स्वत:चे आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणे, विना तिकीट प्रवास करणे अशा घटनांची संख्याही वाढतच आहे. 

Updated: Oct 14, 2017, 10:51 AM IST
फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून ७ कोटी १९ लाखांचा दंड वसूल title=
संग्रहित छाया

मुंबई : मुंबई  आणि उपनगरी रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच स्वत:चे आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणे, विना तिकीट प्रवास करणे अशा घटनांची संख्याही वाढतच आहे. 

अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध सप्टेंबर महिन्यामध्ये केलेल्या कारवाईत पश्चिम रेल्वेने १ लाख ८३ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यामधून पश्चिम रेल्वेने ७ कोटी १९ लाख रुपयांचा दंड वसूल केलाय.

तसेच या महिन्यात ८७६ भिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे परिसरातून बाहेर हाकलण्यात आले. तर १५० जणांना तुरुंगात पाठवण्यात आले. 

पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सप्टेंबर महिन्यामध्ये तिकीट दलाल आणि इतर संशयित व्यक्तीं विरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यामध्ये २१८ जणांना पकडण्यात आले असून रेल्वेच्या नियमानुसार त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले.