आरबीआयकडून बँक व्याजदरात कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 

Updated: Dec 5, 2019, 12:22 PM IST
आरबीआयकडून बँक व्याजदरात कोणताही बदल नाही title=

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो रेट 5.15 टक्के कायम ठेवला आहे. RBIची क्रेडिट पॉलिसी ठरवताना, समिक्षा केल्यानंतर रेपोरेटमध्ये कोणतीही कपात न करण्याचा निर्णय झाला.  MPC च्या सर्व ६ सदस्यांनी रेपो रेट कमी न करण्याच्या बाजूने मत दिलं. रिव्हर्स रेपो रेट देखील 4.90 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

आरबीआयच्या पॉलीसीतल महत्त्वाचे मुद्दे

व्याज दर ५.१५ टक्के कायम
पुढे व्याजदरात कपात होण्याची शक्यता मात्र कायम
CPI चा विचार करून ग्रोथ वर फोकस
ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर अंदाजापेक्षा जास्त
H1 FY20 एप्रिल-सप्टेंबरमध्ये महागाईचं लक्ष्य 3.8-4 टक्के.
H2 FY20ऑक्टोबर-मार्चमध्ये महागाईचं लक्ष्य 4.7-5.1टक्के 
FY20 GDP ग्रोथ अंदाज 6.1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर.
कमी वेळेत महागाईचा स्तर वाढण्याची शक्यता
ग्राहकांपर्यंत कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा फायदा धिम्या गतीने पोहोचतोय
अर्बन को-ओपरेटिव्ह बँकांच्या लँडिंग नियमात बदल करणार