मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या 13 साथीदारांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी चार आरोपींना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर दोघांना पुराव्यांअभावी सोडून देण्यात आले आहे. 2015 साली रवी पुजारीच्या आदेशावर दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, मात्र याची कुणकुण गुन्हे शाखेला लागली आणि 17 नव्हेंबर 2015 ला या टोळीच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या.
Four members of Ravi Pujari gang sentenced to 5 years of rigorous imprisonment by Special MCOCA Court in Mumbai. They were plotting the murder of Director-Producer Mahesh Bhatt.
— ANI (@ANI) April 25, 2018
या सर्व आरोपींवर हत्येचा कट रचणे आणि हत्यार कायद्यांतर्गत या सगळ्यांवर खटला चालवण्यात आला. या प्रकरणी इशरत, हसनत, अज़ीम, अशफाक, आसिफ, शाहनवाज, फिरोज, शब्बीर, रहीम और अनीस यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे तर
रावीकेस सिंह आणि यूसुफ बचकाना यांना पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आलं आहे.
जुहूमध्ये सिनेनिर्माता करीम मरोनी यांच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली होती. या आरोपींनी केलेल्या खुलाशानुसार, पुजारीनं मोरानी ब्रदर्स आणि महेश भट्ट यांच्या सुपारीसाठी आपल्या शुटर्सना 11 लाख रुपये दिले होते. यातील पाच लाख रुपये मोरानी फायरिंग प्रकरणातील आरोपींना मिळाले होते.